लोकमत – शुक्र,
२०११ ऑक्टोबर ७
वसई। दि. ६ (प्रतिनिधी)
वसई-विरार उपप्रदेशाला
पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजित सुसरी नदी प्रकल्पाला जलसंपदामंत्री सुनील तटकरे
यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पासाठी ३८९.४९ कोटी रु.च्या अंदाजपत्रकास
प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली आहे. जलसंपदामंत्र्यांच्या दालनात नुकत्याच
झालेल्या या बैठकीत या प्रश्नी निर्णय घेण्यात आला आहे.
वसई-विरार उपप्रदेशातील
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने डहाणू तालुक्यातील सुसरी नदीवर धरण
बांधून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नी राज्य शासनानेही
उपप्रदेशाच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यास मंजुरी दिली.
या धरणासाठी ८५३.५४ हेक्टर
जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. यामध्ये ८ गावांतील ५७८.१२ हेक्टर खासगी तर २७५.४२
हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. गणेशबाग, नवनाथ, रानशेत, दहिगाव, देवूर, धानीवरी, विवळवेढे व आवढाणी या
गावातील जमिनी प्रकल्पाखाली येणार आहेत.
त्यापैकी
धानीवरी, विवळवेढे, आवढाणी, दहिगाव व देवूर या ५ गावांचे
शासनाला पुनर्वसन करावे लागणार आहे. परंतु स्थानिक ग्रामस्थांचा या नदीचे पाणी
देण्यासाठी विरोध असून त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
No comments:
Post a Comment