News | सुसरी नदीवर धरण बांधण्यास विरोध


डहाणू तालुक्यातील धानवरी येथे बांधण्यांत येणाऱ्या सुसरी नदीवरील धरणाला आदिवासींचा विरोध वाढत आहे. या धरणातून वसई-विरार शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

सरकारच्या या निर्णयास विरोध करताना संघर्ष समिती अध्यक्ष नरेेश बोलाडा यांनी सांगितले की, वसई-विरारकरिता आमचे आयुष्य बरबादीला का टाकायचे, या धरणास विरोध करण्यासाठी रविवार ९ रोजी कासा येथे तालुक्यातील आदिवासी एकत्र येऊन आवाज उठविणार आहेत.

वस...ई तालुक्यातील विरार, नालासोपारा, वसई, माणिकपूर, नवघर आदी ठिकाणी प्रचंड वेगाने गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यांत येत आहेत. त्यांच्यासाठी डहाणू तालुक्यातील सुसरी धरणातून ५४ दशलक्ष लिटर पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता सुसरी धरणलगत असलेल्या डहाणू तालुक्यातील धानिवरी, नवनाथ, रानशेत, दहीगाव, आवंढाणी, देवूर, महालक्ष्मी, गंजाड, गणेशबाग, ओसरवीरा या गावांतील आदिवासींची तसेच वन विभागाची मिळून एक हजार हेक्टरहून अधिक जमीन या धरणात जाणार आहे व त्यामुळे अनेक आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत.

वसई तालुक्यातील विकासाकरिता सरकार व तेथील विकासकांनी पाण्याचा साठा आपल्या तालुक्यात आहे का, याचा विचार करायला हवा, असे बोलाडा यांनी स्पष्ट केले.

२००४ हजार साली सूर्या धरणातील लाखो घनमिटर पाणी वसई तालुक्याला नेऊन डहाणू, पालघर, जव्हार, विक्रमगड आदी ठिकाणच्या शेतकरी तसेच आदिवासीवर मोठा अन्याय केला आहे. गेली २०-२२ वषेर् सूर्या धरणातील पाण्यासाठी पाट खोदून शेतकरी पाण्याची वाट पहात आहेत. मात्र शेतकऱ्यांना पाणी मिळण्याऐवजी सरकारने पुन्हा वसईतील बिल्डरांना पाण्याचा कोटा वाढवून दिल्याचे त्यांनी सांगितले. वसईतील बिल्डरांची पाण्याची पाण्याची तहान भागत नाही, म्हणून आता त्यांची नजर डहाणू तालुक्यावर पडली असून सुसरी धरण बांधून पाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडलाच पाहिजे यासाठी आम्ही हा लढा देणार असल्याचे सांगितले.


Original Link - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10238612.cms 

No comments:

Post a Comment