News | सूर्या प्रकल्पातून शहराला पाणी देण्यास विरोध
म. टा. वृत्तसेवा ।
पालघर
आदिवासी उपयोजना निधीतून बांधण्यात आलेल्या सूर्या प्रकल्पातीेल पाणी या
भागातील आदिवासी व शेतकऱ्यांना न दिल्यास यापुढे एकही थेंब पाणी शहराकडे नेऊ दिले
जाणार नाही, असा इशारा भाजपाचे
विक्रमगडचे आमदार चिंतमाण वनगा यांनी पाणी परिषदेत दिला.
डहाणू
तालुक्यातील तलवाडा येथे भाजपाच्यावतीने पाणी परिषदेचे आयोजन करण्यांत आले होते.
आमदार संजय केळकर, वाड्याचे आमदार विप्णू
सवरा, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष
बाबाजी कोठाळे, प्रदेश उपाध्यक्षा मनिषा
चौधरी उपस्थित होते.
धामणी
व कवडास या दोन धरणांवर सूर्या प्रकल्प उभारण्याकरीता ३०० कोटी रूपये खर्चून आदिवसी
व अन्य शेतकऱ्यांना सिंचनाकरिता व पिण्यासाठी शंभर टक्के तरतूद करण्यात आली.
प्रकल्पामुळे विक्रमगड तालुक्यातील १२ गावे विस्थापित झाली. या गावांतील १४६२
विस्थपित कुटुंबापैकी केवळ ३३८ कुटुंबांचे पुनर्वसन पालघर व डहाणू तालुक्यात
करण्यात आले. मात्र उर्वरीत कुटुंबांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आलेले नाही.
original link - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-7667695,prtpage-1.cms
No comments:
Post a Comment